पुढा-यांशी गुपचुप चर्चा बंद करा, ग्रामसभेशी बोला – संघर्ष समितीचा सरकारला इशारा

वयम् चळवळीच्‍या जव्‍हार तालुक्‍यातल्‍या कार्यकर्त्‍यांनी सरकारच्‍या ‘धरण’शाहीविरूध्‍द रणशिंग फुंकले आहे. प्रकल्‍पात बुडण्‍याचा धोका असलेल्‍या गावातल्‍या लोकांनी कोणत्‍याही राजकीय पक्षाचा आसरा न घेता सर्व लोकांची मिळून संघर्ष समिती बनवली आहे. या समितीने काल शासनाला दिलेले हे निवेदन – 

खरगी हिल धरण विरोधी संघर्ष समिती

दि. 18 जून 2012

मा. जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हा

द्वारा, अपर जिल्‍हाधिकारी

मुख्‍यालय जव्‍हार

निवेदनाचा विषयः खरगी हिल धरण प्रकल्‍पास विरोध व सरकारने ग्रामसभेशी चर्चा करण्‍याचा आग्रह

महोदय,

आम्‍ही – ढाढरी (ग्रा.पं. ढाढरी), कोकणपाडा, रूईपाडा (ग्रा.पं. हातेरी), गवटका, खर्डी, पवनमाळ (ग्रा.पं. सारसून), खरपडपाडा व वाढुपाडा (ग्रा.पं. दाभोसा) येथील ग्रामस्‍थांनी एकत्र येऊन खरगी-हिल धरण विरोधी संघर्ष समिती स्‍थापन केली आहे. शासनाने आतापर्यंत दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्‍पासंदर्भात ग्रामसभेशी कोणतीही चर्चा न करता फक्‍त सरपंच व राजकीय पुढा-यांच्‍या गुप्‍त बैठका घेतल्‍या आहेत. (आपल्‍या कार्यालयातील बैठका दि. 14/11/2011 व 2/4/2012) या बैठकांचे इतिवृत्‍त आम्‍ही माहिती अधिकारात मागूनही शासनाने दिलेले नाही.

प्रकल्‍पग्रस्‍त गावांपासून माहिती दडवण्‍याच्‍या या पध्‍दतीचा आम्‍ही निषेध करत आहोत. ग्रामसभेशी न बोलता प्रकल्‍पाचा फीजिबिलिटी स्‍टडी करण्‍याबद्दल राष्‍ट्रीय जल विकास अभिकरणाचाही आम्‍ही निषेध करतो. आमच्‍या ग्रामसभांनी या धरणाविरोधात केलेले ठरावही या निवेदनासोबत जोडले आहेत.

वन हक्‍क कायदा 2006 (कलम 3-1 व 4-5), पेसा कायदा 1996 (कलम 4), व मुंबई ग्रा.पं. कायदा 1958 (कलम 54) या कायद्यांचे पालन करून शासनाने यापुढील सर्व चर्चा ग्रामसभेशीच करावी, अशी मागणी आम्‍ही करत आहोत. राजकीय पुढारी किंवा प्रतिनिधींशी बंद खोलीत झालेली कोणतीही चर्चा किंवा तडजोड आम्‍ही स्‍वीकारणार नाही.

ग्रामस्‍थांची किमान 50% उपस्थिती असलेल्‍या ग्रामसभेशी चर्चा केल्‍याशिवाय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्‍पाबाबत कोणतेही पाऊल सरकारने उचलू नये. (ग्रामसभेच्‍या संमतीविषयी स्‍पष्‍ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. संदर्भासाठी सोबत जोडलेले पत्र क्र. 11-9/1998-एफ सी दि. 3/8/2009 पहावे)

ग्रामसभेशी समाधानकारक चर्चा होईपर्यंत आम्‍ही सरकारशी पूर्ण असहकार करू, हे ध्‍यानात ठेवावे.

आपले नम्र,

खरगी-हिल धरण विरोधी संघर्ष समिती

प्रतिनिधींची नावे व सह्या

 1.  

विनायक तुळशीराम थाळकर

 1.  

सजन दशमा पारधी

 1.  

दीपक चिंता माडी

 1.  

तुळशीराम सोमा कोकाटे

 1.  

सलीम चिमा मोरघा

 1.  

ताई बाबन दिघे

 1.  

अनुसया रमेश पवार

 1.  

गणपत शंकर खरपडे

 1.  

काशिनाथ देवराम गावित

 1. 10.  

सलाम आवजी खरपडे

जोडपत्रेः- 1) ग्रामसभांचे ठराव, 2) भारत सरकार वन व पर्यावरण मंत्रालयाचा 3/8/2009 चा आदेश 

Image

Advertisements

2 thoughts on “पुढा-यांशी गुपचुप चर्चा बंद करा, ग्रामसभेशी बोला – संघर्ष समितीचा सरकारला इशारा

 1. Great…!!!! he pavul kharya arthane lok jagrutiche lakshan dakhavnare aahe.. ya adhikari aani swarthi padadhikaryanna jantecha vachak asne garjechech aahe.. nahitar he asech mokat sutatil… We are supporting to WAYAM and always with this fight for democracy…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s