रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात

 • रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
 • बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.
 • बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.
 • रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
 • एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
 • ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.
 • रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.
 • रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.
 • रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
 • बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.
 • वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.
 • दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.
 • लेखी तक्रार तहसिलदार किंवा रेशन ऑफिसर यांच्‍याकडेही करता येते. जव्‍हारचे पुरवठा अधिकारी श्री. दुपारे यांचा मोबाईल नं. 9970151606 ऑफिस फोन 02520 222483
Advertisements

19 thoughts on “रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात

 1. khup changal zal tumachi rationing badal mahiti milalyabada jane karu mi amacha village madhe lokana pataun sangu sakato abhari ahe

 2. खुप महत्वाची माहिती आपण देत आहात याचा उपयोग मी गरीब लोकांना फायदा होईल तेथे वापर करायचा प्रयत्न करेल

 3. खुप महत्वाची माहिती आपण देत आहात याचा उपयोग मी गरीब लोकांना फायदा होईल तेथे वापर करायचा प्रयत्न करेल

 4. खुप चांगली माहीती दीली आहे.आम्ही आपले आभारी आहे

 5. मस्त पण आमच्या गावात ह्यातल्या कोणत्याच गोष्टी होत नाही मला तक्रार करायची आहे 9096199006

 6. खुप छान माहिती,मी जिल्हा दक्षता समिती सदस्य म्हणून मला माझ्या कार्यक्षेत्रात चांगले काम करत येईल धन्यवाद।

 7. आमच्या येथील रेशन दुकानावर जर आम्हि २५ किंवा २६ तारखेला धान्य आणायला गेलो तर खुप बडबड करतो. असा काहि नियम आहे का धान्य १५ तारखे पर्यंत न्यायला पाहिजे. माझ्या घरातील लग्नासाठी सर्व मुंबईत होतो म्हणून धान्य आणायला उशीर झाला. तर रेशन दुकानदार म्हणतो कि तुझ कार्डच बंद करतो. खुप राग येतो त्याचा तो हरामी नेहमी बडबड करतो. कृपया याच्यावर काय कराव याच उत्तर द्या

 8. आमच्या गावातले रेशनींग दुकानदार आसा कुठलाही नियम पालत नाही तसेच पावती दिली जात नाही, तक्रार वही नाही, फळक सुधा लावलेल नाही, रेशनिंग सुधा कमी दिले जाते व पैसै सुधा जास्त घेतले जातात .

 9. आमचा दुकानदार दर ३ ते ४ महिन्यानी रेशन वाटते

 10. खूप चानंगली माहीती दिली आहे.
  आभारी आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s