रोजगार हमी कायदा वापरण्‍याची सोपी सूत्रे

1. कामाची मागणी करण्याचा अर्ज म्हणजे नमुना चार 4. हा अर्ज ग्रामपंचायतीत द्यायचा असतो.
2. आपण दिलेल्या अर्जाची ग्रामसेवकाच्या सही शिक्याने मिळालेली पोचपावती म्हणजे नमुना पाच 5.
3. कामावर सात दिवसात हजर व्हा अशी लेखी नोटीस प्रत्येक कुटुंबाला मिळाली पाहिजे. या नोटिसला नमुना सात 7 म्हणतात.
4. नमुना पाच 5 मिळाल्या‍पासून 15 दिवसात जर काम मिळाले नाही, तर तहसिलदाराकडे लेखी तक्रार करायची. या तक्रार अर्जाची झेरॉक्स काढून त्यावर तहसिलदार ऑफिसमधल्यात टपाल क्लर्क कडून सही शिक्का घ्यायला विसरायचे नाही.
5. या तक्रार अर्जात काम मिळावे आणि बेकारी भत्ता मिळावा अशी मागणी करायची आहे. पगाराच्या पावपट बेकारी भत्ता मिळेल असे कायद्याच्या कलम 7(2) मध्ये म्हटले आहे.
6. आपण काम व्यवस्थित केले, पण पगार कमी मिळाला असेल, तर संबंधित खात्याकडे आपल्या कामाची एम्.बी. (मोजमाप नोंदवही) मिळावी असा लेखी अर्ज करा.
7. मस्टर सहा दिवसांचे असते. मस्टर बंद झाले, की 15 दिवसात पगार मिळाला पाहिजे. त्यापेक्षा उशीर झाला, की तहसिलदाराकडे लेखी तक्रार करा.
8. या तक्रार अर्जात किती दिवस उशीर झाला आहे ते लिहा. आणि असे लिहा की, ‘‘किमान वेतन कायदा 1936 कलम 13(अ) नुसार भरपाई भत्ता व थकित मजुरी ताबडतोब मिळावी. तसेच दिरंगाईस जबाबदार अधिकारी/कर्मचार्यावर दंडात्मक कारवाई करावी ही विनंती.’’
9. कोणतीही तक्रार करताना वर ‘तक्रार अर्ज’ असे लिहा. दोन झेरॉक्स काढा. एका झेरॉक्सवर पोचपावतीचा सहीशिक्का घ्या आणि दुसरी झेरॉक्स वयम् च्या कार्यालयात जमा करा.
10. वीस लोकांचे काम असेल आणि तिथे 100 लोकांनी गर्दी केली, तर सर्वांना मजुरी खूप कमी पडेल. कारण कामाच्या मोजमापाप्रमाणे पगार मिळणार आहे.
11. गर्दी होऊ नये, म्हमणून गावात पाडासभा भरवून सर्वांना ‘शेल्फ’ वाचून दाखवा. आणि कोणत्या कामावर कोण जाणार हे ठरवून ठेवा.
12. काम संपल्यानंतर मस्टर सुध्दा पाडासभेत वाचून दाखवा. यामुळे खोट्या हजेर्यांना आळा बसेल.
13. गावाची एक एम्.बी. बनवा आणि प्रत्येक गँगचे (गटाचे) काम टेपने मोजून लिहून ठेवा. पुढे जर रोज कमी पडला, तर आपली एम्.बी. दाखवून सरकारशी भांडता येईल.

Advertisements

One thought on “रोजगार हमी कायदा वापरण्‍याची सोपी सूत्रे

  1. THANKIVE SIR , IT IS VERY IMPORTANT DATA. I WILL PRINT IT AND PASTE IN OUR VILLAGE NOTICE BOARD AND OTHER PLACE WHERE POSSIBLE.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s